राजापूर : महाराष्ट्र राज्य सरकारच्या मंत्रिमंडळाचा शपथविधी सोहळा रविवारी झाला. कोकणातील काही आमदारांचा महायुती सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री तर काही आमदारांचा राज्यमंत्री म्हणून समावेश झाला आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील आमदार उदय सामंत तसेच आमदार योगेश कदम तर लगतच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवलीचे आमदार नितेश राणे यांना देखील मंत्रिपद मिळाले आहे. मंत्रिपदाच्या शपथविधी सोहळ्यानिमित्त राजापूरमध्ये महायुतीच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांमधून जल्लोष साजरा करण्यात आला.
शहरातील जवाहर चौक येथे फटाके फोडून, ढोल ताशांच्या गजरात, आपापल्या पक्षांचे झेंडे फडकवत, एकमेकांना पेढे भरवत आनंदोत्सव साजरा करण्यात आला.
शहरात जल्लोष साजरा करतेवेळी शिवसेना पक्षाचे उपजिल्हाप्रमुख अशपाक हाजू, राजापूर नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष हनीफ मुसा काझी, माजी उपनगराध्यक्ष संजय ओगले, माजी नगरसेवक व शिवसेना शहरप्रमुख सौरभ खडपे, शिवसेना पक्षाचे निरीक्षक संदेश पटेल, भाजपाचे पदाधिकारी अनिल करगुटकर, माजी नगरसेविका शीतल पटेल, भाजपाचे दीपक बेंद्रे, भाजपचे पदाधिकारी अभिजीत गुरव, मन्सूर काजी, ऐजाज बांगी, गनी याहू, कोंडये गावचे उपसरपंच कारेकर आदी महायुतीचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:56 16-12-2024














