रत्नागिरी : ११ पोलीस अंमलदाराना सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक पदी बढती

◼️ वाहतूक शाखेचे कर्तव्यदक्ष कर्मचारी अजय मोहिते यांना देखील मिळाली बढती

रत्नागिरी : पोलीस दलात कोणत्याही मोठ्या शिक्षेस पात्र एन होता २८ वर्षे सेवा बजावून पोलीस दलात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या ११ पोलीस अंमलदाराना सहाय्यक पोलीस उपनिरीक्षपदी बढती देण्यात आली आहे. यामध्ये पोलीस अमलदार बॅचमधील राजेंद्र माळी, संजय भारती, श्रीकांत जाधव, अजय मोहिते, शांताराम पंडेरे, जयश्री सावंत, विनोद भितळे, उदय चांदणे, अरविंद कांबळे, नरेंद्र चव्हाण, आणि यशवंत घडशी यांचा समावेश आहे.

याबद्दल वाहतूक शाखेचे निरीक्षक पाटील यांनी कर्मचारी अजय मोहिते यांचे अभिनंदन करुन पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. तसेच जिल्हा पोलीस अधिक्षक धनंजय कुलकर्णी यांनी देखील बढती मिळालेला पोलीस कर्मचाऱ्यांचे कौतुक केले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
15:30 20-12-2024