खेडमध्ये ३० सप्टेंबर रोजी युवा कार्य प्रशिक्षणार्थी भरती मेळावा

रत्नागिरी : बेरोजगार उमेदवारांना विविध क्षेत्रात रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देण्याच्या दृष्टीने मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी भरती मेळाव्याचे आयोजन ३० सप्टेंबर २०२४ रोजी सकाळी १० वाजता औद्योगिक प्रशिक्षण संस्था, खेड येथे करण्यात आले आहे. तरी जास्तीत जास्त उमेदवारांनी रोजगार मेळाव्यात सहभागी होऊन रोजगार संधीचा लाभ घ्यावा, असे औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य सी.एम. बढीये यांनी केले आहे.

या मेळाव्यामध्ये जिल्ह्यातील शासकीय तसेच खासगी आस्थापनांसह सहकारी संस्थाकडील पदासाठी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थीची निवड करणार आहेत. उमेदवारांनी मेळाव्याच्या दिवशी मुलाखतीकरिता त्यांचे 5 बायोडाटा व इतर आवश्यक शैक्षणिक कागदपत्रांच्या प्रतींसह प्रत्यक्ष उपस्थित राहावे. रोजगार मेळाव्यामध्ये सहभागी होण्यासाठी आपली नोंदणी रत्नागिरी जिल्हा कौशल्य रोजगार व नाविन्यता उद्योजकता मार्गदर्शन केंद्र येथे करावी. नाव नोंदणी नसल्यास जिल्हा कौशल्य विकास रोजगार यांच्याकडे संपर्क साधावा. अधिक माहितीसाठी कार्यालयाचे एस.एस. खोपकर, मोबाईल क्रमांक 7875345400 टि.डी. लोंढे मो.क्र. 7083151876, या क्रमांकावर संपर्क साधावा.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:45 PM 28/Sep/2024

Shiva optical