रत्नागिरी : रत्नागिरीचे जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांच्या नावे Devendra Singh IAS Ratnagiri Collectorate या नावाने एक बनावट फेसबुक खाते तयार करण्यात आले आहे.
ते रत्नागिरीचे जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांचे नाही. यावरून आलेली मैत्रिची विनंती कोणीही स्वीकारू नये, असे आवाहन करण्यात येत आहे.
या बनावट खात्यावर एका महिलेच्या छायाचित्राचा वापर करण्यात आला आहे. या खात्यावर अजिबात विश्वास ठेवू नये. या खात्यावरील कोणत्याही बातमीवर किंवा कोणत्याही संदेशावर विश्वास ठेवू नये. जिल्हाधिकाऱ्यांच्या Collector & District Magistrate-Ratnagiri याच अधिकृत खात्यावरून शासकीय उपक्रमांची माहिती दिली जाते. अन्य कोणत्याही प्रकारचे संदेश पाठवले जात नाहीत. फेसबुक वापरकर्त्यांनी, दर्शकांनी आणि नागरिकांनी याची नोंद घ्यावी, असे सूचित करण्यात आले आहे.