पाली ग्रामीण रुग्णालयात शस्त्रक्रिया, रक्तदान आणि दिव्यांग शिबिर

पाली : ग्रामीण रुग्णालय पाली येथे शस्त्रक्रिया, रक्तदान शिबिर आणि दिव्यांग शिबिराचे आयोजन उद्योग व मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांच्या वाढदिवसानिमित्त करण्यात आले होते.

पाली येथे झालेल्या कार्यक्रमाची संकल्पना जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. भास्कर जगताप व अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. विकास कुमरे यांनी मांडली होती. या शिबिरात रत्नागिरी तालुक्यातील व दशक्रोशीतील अनेक रुग्णांनी लाभ घेतला. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उद्योजक रवींद्र सामंत उपस्थित होते. या कार्यक्रमावेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. भास्कर जगताप, डॉ. कुमरे, पाली सरपंच विठ्ठल सावंत, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक रामचंद्र गराटे, प्रकाश परपते, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. अंकुश शिरसाट, वैद्यकीय अधिकारी डॉ. सचिन साळुंखे, डॉ. मनिष वर्मा, दंत शल्य चिकित्सक डॉ. शुभदा बडवे, डॉ. नेहा बोले, सर्व अधिकारी व कर्मचारी, श्रीमती पाथरे उपस्थित होते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:21 AM 30/Dec/2024

Rotery school