क्रेडाई रत्नागिरीतर्फे सायबर गुन्हा जागरूकता प्रोग्राम

रत्नागिरी : क्रेडाई रत्नागिरीतर्फे सायबर गुन्हा जागरूकता प्रोग्राम दि. ०३/०१/२०२५ रोजी सकाळी ११ ते २ वाजेपर्यंत हॉटेल लँडमार्क, थिबा पॅलेस रोड, रत्नागिरी येथे आयोजित करण्यात आला आहे.

या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी श्री. धनंजय कुलकर्णी (पोलीस अधिक्षक, रत्नागिरी) व श्रीमती. जयश्री गायकवाड ( अपर पोलीस अधीक्षक, रत्नागिरी) उपस्थित राहणार आहेत. तसेच प्रमुख वक्ते म्हणून श्रीमती. स्मिता सुतार (पोलीस निरीक्षक, सायबर विभाग) व श्री. नितीन पूरळकर (सहा. पोलीस निरीक्षक) उपस्थित राहणार आहेत.

या कार्यक्रमामध्ये बांधकाम व्यवसायातील सायबर (इंटरनेट) गुन्हे, ऑनलाईन फसवणुकीतील धोक्यांची समज वाढवण्यासाठी तसेच सायबर सुरक्षेच्या महत्वाविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमामध्ये बांधकाम विकासकांना व्यवसायातील सायबर धोके तसेच या संबंधीचे सायबर सुरक्षा व पद्धती बद्दल जागरूक करणे. सायबर गुन्हयांना कशा पद्धतीने प्रतिबंध करता येईल याची माहिती या कार्यक्रमामध्ये मिळणार आहे.

या कार्यक्रमामध्ये सायबर गुन्हयांचे प्रकार, ऑनलाईन सुरक्षा टीपा, मोबाईल व डिव्हाईस सुरक्षा, डिजिटल फूटप्रिंट, सायबर गुंडगिरी, ऑनलाईन छळ, सायबर गुन्ह्यांची तक्रार करणे आणि मदत घेणे यांसारखे महत्वाचे विषय या कार्यक्रमात घेण्यात येणार आहेत.

या कार्यक्रमासाठी क्रेडाई संस्थेचे सर्व बांधकाम व्यावसायिक (बिल्डर) उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमाचे प्रमुख प्रायोजक शिर्डी स्टील कंपनी यांनी स्वीकारले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:31 31-12-2024