वेंगुर्ले : ‘माझी वसुंधरा अभियान ४.०’ स्पर्धेत वेंगुर्ले नगरपरिषदेने कोकण विभागात प्रथम क्रमांक प्राप्त केला असून ७५ लाखाचे बक्षीस प्राप्त होणार आहे. या यशामुळे वेंगुर्लेच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.
स्वच्छतेसह पर्यावरण रक्षण यासारख्या सर्व क्षेत्रांत वेंगुर्ले नगरपरिषदेने ‘माझी वसुंधरा अभियान ४.०’ अंतर्गत उत्कृष्ट काम केले आहे. त्यामुळे १५ हजारपेक्षा कमी लोकसंख्या या गटामध्ये वेंगुर्ले नगरपरिषदेला कोकण विभागात प्रथम क्रमांक प्राप्त झाला असून, ७५ लाखांचे वक्षीस मिळणार आहे. वेंगुर्ले नगरपरिषदेने स्वच्छतेमधून समृद्धीकडे आणि विकासाकडे जाण्याचा मार्ग दाखवून दिला आहे. आजपर्यंत अनेक पुरस्कार या नगरपरिषदेने मिळविले आहेत. मात्र, स्वच्छतेचा आणि पर्यावरण संवर्धनाचा घेतलेला वसा कायम ठेऊन आपले काम सातत्याने पुढे नेले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:58 AM 30/Sep/2024