रत्नागिरी : सन २०२५ या नवीन वर्षाचे स्वागतासाठी स्वामी स्वरूपानंद सहकारी पतंसस्थेने प्रतिवर्षाप्रमाणे नववर्ष स्वागत ठेव योजना घोषित केली आहे. या नववर्ष स्वागत ठेव योजनेला १ जानेवारीपासून सुरुवात होत आहे.
या नववर्षाच्या स्वागत ठेव योजनेत १६ ते १८ महिने मुदतीच्या स्वरूपांजली ठेव योजनेत सर्वसामान्य ठेवीदारांसाठी ८.५० टक्के ज्येष्ठ नागरिक व महिला ठेवीदारांसाठी ८.७५ टक्के तर १९ ते ३६ महिने मुदतीच्या सोहम ठेव योजनेत सर्वसामान्य ठेवीदारांसाठी ८.६० टक्के व ज्येष्ठ नागरिक व महिला ठेवीदारांसाठी ८.८० टक्के एवढा व्याजदर घोषित केला आहे. तसेच एकरकमी ६ लाख रुपये आणि अधिक रकमेसाठी ९ टक्के व्याजदर देऊ केला आहे.
२०२४अखेर संस्थेकडे रुपये ३३२ कोटी ९४ लाखांच्या ठेवी जमा असून आर्थिक वर्षात २४ कोटींच्या ठेवी वाढल्या आहेत. वाढत्या ठेवींबरोबर कर्जव्यवहार व गुंतवणुकांमध्येही वाढ झालेली असून संस्थेचा स्वनिधी ४७ कोटी ९७ लाखापर्यंत पोचला आहे. संस्थेचे खेळते भांडवल ४०० कोटीच्या नजीक पोहोचले आहे. या मासात १० कोटींच्या ठेवी जमा करून खेळते भांडवल ४०० कोटी पार करण्याचा संकल्प करण्यात आला आहे.
संस्थेने ठेवींची सुरक्षितता, विश्वासार्हता याला अनन्यसाधारण महत्त्व देऊन गेली ३२ वर्षे मार्गक्रमण केले. जनमानसात पतसंस्थेबद्दल असलेली स्वच्छ प्रतिमा ग्राहकांचा स्नेह, विश्वास या बळावर संस्थेची वाटचाल अधिक उत्तम पद्धतीने मार्गस्थ होत आहे.
संस्थेच्या पावस, जाकादेवी, कुवारबाव, खंडाळा, चिपळूण, पाली, साखरपा, नाटे, मालगुंड, लांजा, राजापूर, पुणे कोथरूड, देवगड जामसंडे, देवरूख व रत्नागिरी शहरामध्ये मारुती मंदिर व कोकण नगर अशा शाखा असून या शाखांमध्ये या योजनेचा लाभ मिळू शकतो.
जास्तीत जास्त ग्राहकांनी संस्थेच्या ठेव योजनांमध्ये गुंतवणूक करण्याचे आवाहन अध्यक्ष ॲड. दीपक पटवर्धन यांनी केले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:01 01-01-2025













