जैतापूर समुद्रात मासेमारीदरम्यान घडली घटना; पालघर येथील खलाशावर रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू
रत्नागिरी :
जैतापूर समुद्रात बोटीवर मासेमारी करत असताना समुद्री सापाने दंश केलेल्या एका खलाशाला अधिक उपचारासाठी रत्नागिरीतील जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ही घटना ३० सप्टेंबर रोजी सकाळी ६ वाजेच्या सुमारास घडली.
संदेश मादू राणजे (वय ४८, रा. कलासरी-वरचापाडा, जि. पालघर) असे समुद्री सापाने दंश केलेल्या खलाशाचे नाव आहे. संदेश राणजे हे समुद्रात बोटीवर मासेमारी करत असताना अचानक एका समुद्री सापाने त्यांना दंश केला.
सहकाऱ्यांची तत्परता आणि प्रथमोपचार
घटना घडताच बोटीवरील सहकाऱ्यांनी तत्परता दाखवत त्यांना तातडीने किनाऱ्यावर आणून जैतापूर प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. तेथे प्राथमिक उपचार केल्यानंतर, पुढील अधिक आणि वैद्यकीय उपचारासाठी त्यांना रत्नागिरीतील जिल्हा शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले. याप्रकरणी जिल्हा रुग्णालयातील पोलीस चौकीत अधिकृत नोंद करण्यात आली आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:17 03-10-2026















