देवरुख : शहरातील गायत्री जोशी यांच्या स्वरब्रह्म क्लासेसतर्फे आयोजित संगीत कार्यशाळा श्री सद्गुरु लोकमान्य वाचनालयात झाली. या कार्यशाळेला विद्यार्थ्यांचा चांगला प्रतिसाद लाभला. दिल्ली व पुणे आकाशवाणीच्या हिंदी सुगम संगीत व भजन मान्यता प्राप्त कलाकार प्रा. अभिनेत्री गात (संगीत अलंकार) आणि सुगम संगीत गायिका प्रा. मुक्ता गरसोळे-कुलकर्णी (संस्कृत विशारद) या दोघींनी मार्गदर्शन केले. या कार्यशाळेसाठी तबला साथ ऋषिकेश आचार्य (तबला विशारद) आणि हार्मोनियमची साथ कीर्तनकार ह. भ. प. कुमार भाट्ये यांनी केली.

संगीत कार्यशाळेचे उद्घाटन दीप प्रज्वलनाने शामकांत अळवणी, अॅड. गिरीश गानू, अमोघ पेंढारकर, वाचनालयाचे अध्यक्ष प्रा. जी. के. जोशी यांनी केले. यानंतर गायत्री जोशी यांच्या शिष्यानी ईशस्तवन व स्वागत गीत सादर केले. प्रास्ताविक गायत्री जोशी यांनी केले. सूत्रसंचालन अॅड. स्वाती गोडे यांनी केले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:44 AM 01/Jan/2025













