रत्नागिरी : पतंजली योग संस्था व ओम साई मित्र मंडळातर्फे ८ ते १५ जानेवारीला योग शिबिर

रत्नागिरी : पतंजली योग संस्था व ओम साई मित्र मंडळ यांच्या समन्वयाने दि. ८ ते १५ जानेवारी या कालावधीत सकाळी सहा ते आठ या वेळेत योग शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबिर ओमसाई सांस्कृतिक भवन, साळवी स्टॉप नाचणे रोड, शिक्षक पतपेढी समोर, रत्नागिरी येथे होणार आहे.

सध्याच्या धावपळीच्या जीवनात लोकांना अनेक प्रकारचे आजार जसं की मधुमेह, उच्च रक्तदाब, तसंच हृदयविकार, ब्लड प्रेशर, दमा यासारख्या असंख्य विकारांना सामोरे जायला लागते. आजारपणावर सर्वांचे हजारो किंवा लाखो रुपये खर्च होत आहेत. या सर्वांचा विचार करून प्रत्येकाने दररोज प्राणायाम योगासन सूर्यनमस्कार याचा अवलंब आपल्या जीवन पद्धतीत करावा, शिकून घ्यावं जेणेकरून आपण रोगमुक्त व्हाल, तसेच भविष्यात कुठल्याही आजाराला साथीला आपण बळी पडणार नाही. हे योग शिबिर आयोजित केले आहे. या शिबिरात केवळ ५० जणांनाच सहभागी होता येणार आहे. नाव नोंदणीसाठी अनंत आगाशे व समीर भाटवडेकर यांच्याशी संपर्क साधावा.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:40 PM 01/Jan/2025