रत्नागिरी : रत्नागिरी शहरातील मारुती मंदिर ते मिरकरवाडा जवळील दांडा फिशरीज पर्यंतचे रस्त्याचे काँक्रीटीकरण काम सहा महिन्यांपर्यंत चालणार आहे. चार टप्प्यात हे काम केले जाणार आहे. पहिल्या टप्प्यातील मारुती मंदिर ते माळनाका पर्यंतचे काम सुरू झाले आहे. दोन मार्गातील वाहतूक एका दिशेने सुरू करून काँक्रिटीकरण केले जात आहे. एकदिशा मार्गातून होणारी दुहेरी वाहतूक गैरसोयीची असली तरी वाहनधारक आणि पादचा-यांकडून त्यासाठी सहकार्य होत आहे.
रत्नागिरी शहरातील रस्त्यांचे काँक्रिटीकरण पावसाळ्यापूर्वी सुरू झाले. चर्मालय ते मारुती मंदिर, साळवी स्टॉप ते मारुती मंदिर आणि नाचणे ते मारुती मंदिर पर्यंतचे काँक्रिटीकरणपूर्ण झाले आहे. आता मारुती मंदिर ते दांडा फिशरीजपर्यंतच्या कामाला सुरुवात झाली आहे. या संपूर्ण काँक्रिटीकरण कामाला आणखी सहा महिने लागणार आहेत, अशी माहिती संबंधितांकडून मिळत आहे.
पहिल्या टप्प्यातील मारुती मंदिर ते माळनाका पर्यंतचे काम हाती घेण्यात आले आहे. या कामासाठी दुहेरी वाहतूक एकदिशा मार्गातून केली जात आहे. या दरम्यान वाहनधारक आणि पादचाऱ्यांची गैरसोय होत असली तरी विकास कामासाठी कोणाकडूनही कुरबूर होताना दिसून येत नाही. वाहतूक पोलिसही एकदिशा मार्गातून होणारी दुहेरी वाहतूक सुरळीत व्हावी यासाठी दक्षता घेत आहेत. दुसऱ्या टप्प्यातील काँक्रीटीकरण माळनाका ते जयस्तंभ त्यानंतर जयस्तंभ ते आठवडा बाजार आणि आठवडा बाजार ते दांडा फिशरीज अशा चार टप्प्यात कॉक्रिटीकरण होणार आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:22 AM 30/Sep/2024