पालीत आ. किरण सामंत यांच्या वाढदिवसानिमित्त किंगमेकर चॅम्पियन्स ट्रॉफी व प्रीमियर लीगचे आयोजन

पाली : रत्नागिरी जिल्ह्यातील प्रसिद्ध उद्योजक व महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष, महाराष्ट्र शासनाच्या रत्नसिंधु योजनेचे संचालक आ. किरण सामंत यांच्या वाढदिवसानिमित्ताने पाली येथे किंगमेकर चॅम्पियन्स ट्रॉफी व पाली प्रीमियर लीगचे आयोजन ३,४,५,६,७ जानेवारी २०२५ रोजी पर्यंत करण्यात आले आहे.

स्पर्धेत सहभागी होणाऱ्या संघांनी नोंदणी करावयाची आहे. संघाच्या खेळाडूंनी येताना आधार कार्ड सोबत आणावे असे आवाहन आयोजकांमार्फत करण्यात आले आहे. किंगमेकर चॅम्पियन्स ट्रॉफीतील विजेत्या संघाला रुपये २,००,००० व चषक तसेच उपविजेत्या संघाला रुपये १,२५,००० व चषक असे बक्षीस देण्यात येणार आहे. मालिकावीर रुपये ५,५५५,उत्कृष्ठ फलंदाज व गोलंदाज रुपये ३,३३३ खेळाडूंना देण्यात येणार आहे तसेच पाली प्रीमियर लीगमधील विजेत्या संघाला रुपये ६६,६६६ व चषक तसेच उपविजेत्या संघाला रुपये ४४,४४४ व चषक असे बक्षीस देण्यात येणार आहे. मालिकावीर रुपये ५,५५५,उत्कृष्ठ फलंदाज व गोलंदाज रुपये ३,३३३ खेळाडूंना देण्यात येणार आहे. किंग मेकर चॅम्पियन ट्रॉफी मध्ये प्रवेश घेणाऱ्या संघांसाठी प्रवेशफी रुपये ३०,००० आहे. सर्व सामने लीग पद्धतीने खेळवले जाणार आहेत.

संघांनी अधिक माहिती करिता सौरभ खाके ९६७३५२८३२५, अतुल सावंत ९४०४१६०३३४, मनीष सावंत ८६०५३५६९९९, नितीन गराटे८९९९१९८४२८ सागर कांबळे ८८८८३३०७६४ या क्रमांकांवर संपर्क साधण्याचे आवाहन आयोजकांमार्फत करण्यात आले आहे.

या स्पर्धेचे आयोजन किरणोदय प्रतिष्ठान पाली व शिवसेना पाली यांनी केले आहे. या भव्य ओव्हरआर्म ओपन क्रिकेट स्पर्धा दिवस रात्र पाली हेलिपॅड मैदानावर होणार आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:08 02-01-2025