संगमेश्वरमध्ये शोध मोहिमेत सापडले दोन कुष्ठरुग्ण

देवरुख : संगमेश्वर तालुक्यात घेण्यात आलेल्या कुष्ठरोग तपासणी मोहिमेत तालुक्यात कुष्ठरोगाचे दोन रुग्ण सापडले. यामुळे शासनाचा कुष्ठरोग निर्मुलनाला खीळ बसली आहे.

तालुक्यात १६ ते २० डिसेंबर या कालावधित ही शोध मोहीम घेण्यात आली. यात आरोग्य कर्मचारी, परिचारिका, आशा यांनी घरोघरी जाऊन कुटुंबातील प्रत्येक व्यक्तींची तपासणी केली. तालुक्यातील २२२ घरातून ४ हजार ७५१ व्यक्तींची तपासणी पूर्ण केली. यातून अंगावर चट्टे तसेच खाज असणारे व त्वचेवर काही डाग दिसून येणे असे ६७ संशयित रुग्ण आढळले. यांची पुढील तपासणी व चाचण्या करण्यात आल्या. यातून २ रुग्ण हे कुष्ठरोगाचे असल्याचे निष्पन्न झाले. यातील एक रुग्ण हा देवळे प्राथमिक आरोग्य केंद्र तर दुसरा फुणगूस केंद्र अंतर्गत परिसरातील आहेत. शासन कुष्ठरोग समुळ नाश झाल्याच्या वल्गना करीत होते. आता हे रुग्ण मिळून आल्याने आरोग्य विभागाची चांगलीच धावपळ उडाली आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:47 AM 02/Jan/2025

Arihant 4