राजापूर : श्री देव धूतपापेश्वर मंदिर परिसराच्या सुशोभीकरण कामात अनेक त्रुटी; आ.किरण सामंत यांनी केल्या सूचना

राजापूर : तालुक्याचे आराध्य दैवत असलेल्या श्री देव धूतपापेश्वर मंदिर आणि परिसराच्या सुशोभिकरणाच्या कामात अनेक त्रुटी असून, ग्रामस्थांना विश्वासात न घेता हे काम सुरू असल्याच्या तक्रारी येथील ग्रामस्थांनी आमदार किरण उर्फ भैया सामंत यांच्याकडे केल्यानंतर हे काम तत्काळ थांबविण्याच्या सूचना आ. सामंत यांनी दिल्या आहेत. तसेच याबाबत अधिकारी तसेच संबंधित ठेकेदार व ग्रामस्थांची संयुक्त बैठक घेऊन कामाचे नियोजन करण्यात येईल असेही आ. सामंत यांनी यावेळी सांगितले.

प्राचीन मंदिरांच्या जतन-संवर्धन आणि परिसर विकास कार्यक्रमा अंतर्गत राजापूर तालुक्याचे आराध्य दैवत असलेल्या श्री देव धूतपापेश्वर मंदिर आणि परिसराच्या विकासासाठी शासनाने 11 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. त्यामध्ये प्रामुख्याने तीन विभागात कामे प्रस्तावित करण्यात आलेली आहेत. यामध्ये मंदिराचा जीर्णोध्दार व पुनर्बांधकाम करणे, मंदिर परिसराचा जीर्णोध्दार व संवर्धन करण्यात येणार आहे. या कामामध्ये धुतपापेश्वर मंदिराकडे येणार्‍या मार्गावर भाविकांसाठी आवश्यक दुकान गाळ्यांची बांधणी करणे, मृडानी नदीवरील पुलाचे विद्युतीकरण व सुशोभिकरण करणे, पर्यटक व भाविकांच्या दृष्टीने परिसर विकास, विश्रामगृह तसेच प्रसाधनगृहाची दुरूस्ती, दत्त मंदिराच्या दर्शनी भागाचे सुशोभिकरण, मंदिर परिसरातील सिमेंट ब्लॉक परसबंदी काढून कातळ दगडात परसबंदी, मंदिराच्या प्रवेशद्वारापुढील मार्गाच्या सिमेंट ब्लॉक काढून जांभ्या दगडात परसबंदी करणे आदी कामे करण्यात येत आहे.

दरम्यान, श्री धूतपापेश्वर मंदिर आणि परिसर सुशोभिकरणाचे निम्म्यापेक्षा अधिक काम पूर्ण झाले आहे. मात्र, हे काम होत असताना ग्रामस्थांना विश्वासात घेतले जात नसल्याच्या तकारी सुरुवातीपासून होत होत्या. शिवाय या कामात अनेक त्रृटी असल्याचे देखील ग्रामस्थांचे म्हणणे आहे. या पार्श्वभूमीवर मंगळवारी धोपेश्वर ग्रामपंचायत येथे ग्रामस्थांशी संवाद साधण्यासाठी आलेल्या आमदार किरण सामंत यांनी श्री धूतपापेश्वर मंदिरात जात दर्शन घेतले तसेच मंदिराच्या कामाची पाहणी केली. यावेळी उपस्थित ग्रामस्थांनी मंदिर सुशोभिकरण कामामध्ये असलेल्या त्रुटी आ. सामंत यांच्या निदर्शनास आणून दिल्या.

आ. सामंत यांनी हेे काम तत्काळ थांबविण्याच्या सूचना देत लवकरच पशासकीय अधिकारी, संबंधित ठेकेदार आणि ग्रामस्थ यांची संयुक्त बैठक घेवून कामाचे नियोजन करण्यात येईल, असेही आ. सामंत यांनी ग्रामस्थांना आश्वस्त केले. यावेळी शिवसेना तालुकापमुख दीपक नागले, जिल्हा संघटक प्रकाश कुवळेकर, धोपेश्वर सरपंच गणेश पाष्टे, उपसरपंच नरेश सूद, सदस्य उमेश शिवगण, शिवसेना शहरपमुख सौरभ खडपे, सागर खडपे, संतोष लिंगायत, प्रकाश नाडणकर, सौरभ मसुरकर, गौरव शिंदे, जितेंद्र तुळसावडेकर यांच्यासह धोपेश्वर ग्रामस्थ उपस्थित होते.

Shanti real estate 1

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:05 AM 02/Jan/2025