राजापूर : अल्पवयीन मुलीवरील अत्याचाराविरोधात सर्वपक्षीय नागरिक एकवटले

राजापूर : जिल्ह्यातील एका अल्पवयीन मुलीवर नराधमाने लैंगिक अत्याचार केल्याचे पुढे आले आहे. या घटनेचा निषेध करीत संशयिताला कठोरातील कठोर शिक्षा करण्यात यावी, अशी मागणी निवेदनाद्वारे जैतापूर पंचक्रोशीतील सर्वपक्षीय नागरिकांनी पोलिसांकडे केली आहे.

याबाबतचे निवेदन नाटे पोलिसांना देण्यात आले. यावेळी सिद्धी शिरसेकर, हर्षदा खानविलकर, भाग्यश्री चव्हाण, साक्षी जैतापकर, प्राजक्ता पांचाळ, स्वरा भोसले, सम्राज्ञी शिरवडकर आदी उपस्थित होते. या प्रकरणाची निःपक्षपातीपणे सखोल चौकशी करून संबंधित संशयित गुन्हेगाराला त्वरित कठोर शिक्षा देण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:13 AM 02/Jan/2025