रत्नागिरी : गोळपचे पोलिसपाटील नीलेश भाटकर यांनी वृद्धाश्रमात केला वाढदिवस साजरा

पावस : गोळपचे पोलिसपाटील नीलेश भाटकर यांचा वाढदिवस पावस येथील अनसुया आनंदी महिला वृद्धाश्रमात साजरा करण्यात आला. या वेळी पूर्णगड सागरी पोलिस ठाण्यांतर्गत गावातील पोलिसपाटील, समाजातील मान्यवर, मित्रमंडळी उपस्थित होते.

या प्रसंगी जांभूळ आडगावचे पोलिसपाटील जयंत फडके म्हणाले, बदलत्या समाजव्यवस्थेत आणि कुटुंबव्यवस्थेत वृद्धाश्रम ही सामाजिक गरज बनली आहे. प्राप्त परिस्थितीत आनंदाने या प्रश्नाला सामोरे जाण्यासाठी समाजानेही या वृद्धाश्रमांना सहकार्य करायला हवे या दृष्टीने आज या कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले. या निमित्ताने वृद्ध माताभगिनींना आवश्यक साहित्य देण्यात आले. यातून समाजाने प्रेरणा घेऊन समाजाप्रती आपले उत्तरदायित्व निभावावे.

भाटकर म्हणाले, समाजामध्ये वावरत असताना अनेक ठिकाणी आपल्या मुलांचे वाढदिवस कुटुंबामध्ये साजरे केले जातात; परंतु त्यामध्ये अनेकवेळा वृद्ध मातांचा समावेश नसतो. त्यामुळे अनेक वृद्ध मातांना वृद्धाश्रमाचा आश्रय घ्यावा लागतो. त्यामुळे त्यांना या नातवंडांच्या वाढदिवसाचा आनंद लुटता येत नाही. त्यामुळे आपला वाढदिवस वृद्धाश्रमामध्ये करावा, या उद्देशाने गेली तीन वर्षे हा कार्यक्रम करत आहे. वृद्धाश्रमाच्या व्यवस्थापिका राधा फडके, विश्वस्त सरिता देसाई, आमदार उदय सामंत यांचे स्वीय सहाय्यक नेताजी पाटील, बंटी कीर, शिवसेना उपविभागप्रमुख बंधू वारीशे, जितेंद्र शिर्सेकर, पूर्णगड सागरी पोलिस ठाण्याचे पोलिस अंमलदार, पोलिस पाटील आदी उपस्थित होते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:25 AM 02/Jan/2025