खेड : एसटी बसमध्ये कार्यरत कर्मचारी व सेवानिवृत्तांच्या कुटुंबांना एसटीमधून बारमाही प्रवास मोफत मिळावा यासाठी २६ जानेवारीला तहसील कार्यालयासमोर उपोषण करणार असल्याचे निवेदन येथील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते व एसटी कर्मचारी संघटना माजी सचिव चंद्रकांत मोरे यांनी दिले आहे.
एसटी कर्मचाऱ्यांच्या कुटुंबांना वर्षातून दोन महिन्यांचा मोफत प्रवास सुविधा आहे. सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना सहा महिन्यांची सूट मिळते.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:17 02-01-2025














