खेड : आय.सी.एस.महाविद्यालयात ‘ट्रॅव्हल अँड टुरिझम’ विषयावर कार्यशाळा

खेड : येथील सहजीवन शिक्षण संस्थेच्या कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात ‘ट्रॅव्हल अँड टुरिझम’ या विषयावर एकदिवशीय कार्यशाळा घेण्यात आली. या कार्यशाळेचा महाविद्यालयातील १०० विद्यार्थ्यांनी लाभ घेतला. यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना प्राध्यापक सूर्यकांत ठाकरे यांनी पर्यटन क्षेत्रातील हॉस्पिटॅलिटी व हॉटेल इंडस्ट्री याबद्दल सविस्तर माहिती दिली. या क्षेत्रात असणाऱ्या व्यवसायाच्या संधी व त्यातील अडचणी यावर त्यांनी सविस्तर मार्गदर्शन केले. संजय काशीद यांनी कोकणामध्ये असणाऱ्या पर्यटनातील संधी व तरुणांना हे क्षेत्र कशा पद्धतीने रोजगार देणारे आहे याविषयी मार्गदर्शन केले. प्राचार्य प्रो. डॉ. अनिता आवटी यांनीही मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉ. चंद्रशेखर साळुंखे, प्रा. विपुल गायकवाड, प्रा. सुप्रिया कडगे, प्रा. लीना चिखले, डॉ. अभिमन्यू जाधव आदींनी सहकार्य केले. प्रास्ताविक व सूत्रसंचालन प्रा. विपुल गायकवाड यांनी केले. आभार प्रा. सुप्रिया कडगे यांनी मानले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:31 PM 02/Jan/2025