देवरूख : देवरूख शिक्षण प्रसारक मंडळाच्या आठल्ये-सप्रे-पित्रे महाविद्यालय राष्ट्रीय सेवा योजना विभाग आयोजित श्रमसंस्कार शिबिरात पोलिस अंमलदार सागर मुरूडकर यांनी विद्यार्थ्यांना महिला सुरक्षा आणि सायबर सिक्युरिटीबद्दल विविध प्रकारच्या घटना सांगून विद्यार्थ्यांना जागृत केले.
सद्यःस्थितीत विद्यार्थ्यांचा सामाजिक माध्यमाचा अतिवापर आणि त्यापासून उद्भवणारे धोके या विषयी उद्बोधन केले. त्यांनी विद्यार्थ्यांना सोशल मीडिया न वापरण्याचा सल्ला दिला. जर सोशल मीडिया वापरत असाल तर कोणत्याही प्रलोभनाला बळी पडू नका. सुरुवातीलाच अशा प्रकारच्या संदेशाला आपल्यापासून दूर ठेवा. महिला सुरक्षा सध्याचा ज्वलंत विषय असून, विद्यार्थिनींनी कोणत्याही प्रलोभनाला बळी न पडता स्वतःला आवरणे व सतर्क राहणे गरजेचे आहे. आपल्यासोबत कोणत्याही प्रकारचा धोका झाला असल्यास, फसवणूक केली गेली असल्यास त्याची माहिती जवळच्या पोलिस ठाण्याला देणे गरजेचे आहे जेणेकरून कायदेशीररित्या त्याची चौकशी केली जाईल. या कार्यक्रमाला डॉ. प्रशांत नारगुडे, अनिकेत ढावरे आणि प्राध्यापिका प्रज्ञा शिंदे उपस्थित होते.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:52 PM 02/Jan/2025














