रत्नागिरी : जलतरण तलावाजवळ मद्यपान करणाऱ्या पाच तरुणांवर गुन्हा दाखल

रत्नागिरी : शहरातील साळवी स्टॉप येथील सार्वजनिक ठिकाणी मद्य प्राशन करणाऱ्या पाच तरुणांविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुयोग जितेंद्र मयेकर (वय २४), मृणाल रोहिदास जोशी (वय ३५), रवींद्र बबन माने (३२), शुभम प्रकाश चव्हाण (३०), गणेश दशरथ पवार (३८) अशी संशयितांची नावे आहेत. घटना बुधवारी (ता १) रात्री अकरा ते एकच्या सुमारास साळवी स्टॉप येथील जलतरण तलाव येथे निदर्शनास आली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, संशयित मध्यरात्री सार्वजनिक ठिकाणी महा प्राशन करत असताना निदर्शनास आले. या प्रकरणी पोलिस हेडकॉन्स्टेबल आशिष भालेकर, पंकज पडेलकर, पोलिस कॉन्स्टेबल अमित पालवे, सहाय्यक पोलिस फौजदार दीपक साळवी, पोलिस हेडकॉन्स्टेबल अमोल साळवी यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. दरम्यान, पावस तालुक्यातील गावखडी समुद्रकिनाऱ्यावरती सुरूबनात मद्य प्राशन करणाऱ्या तिघांविरुद्ध पूर्णगड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नवीद नासिर दर्वेश (वय २४), अब्दुल बाशीत भट्टीवाले (२३), फहद कामलुद्दीन दर्वेश (२६) अशी संशयितांची नावे आहेत.