आठल्ये सप्रे पित्रे महाविद्यालयात वाचन संकल्प उपक्रम

देवरुख : वाचन संस्कृतीच्या विकासाने तरुणांच्या व्यक्तिमत्त्वाची उन्नती आणि समाज प्रबोधन होण्याच्या दृष्टीने महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागाने आयोजित केलेल्या वाचन संकल्प महाराष्ट्राचा या उपक्रमाची सुरुवात देवरुख शिक्षण प्रसारक मंडळाच्या आठल्ये सप्रे पित्रे महाविद्यालयात नव वर्षाच्या आरंभी करण्यात आली. या उपक्रमांतर्गत महाविद्यालयात १ ते १५ जानेवारी या कालावधीत वाचन पंधरवडा राबविण्यात येणार असून, विविध साहित्यिक कार्यक्रम व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमाची सुरुवात महाविद्यालयाच्या कनिष्ठ विभागात विद्यार्थ्यांच्या सामूहिक वाचनाने करण्यात आली. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नरेंद्र तेंडोलकर आणि उपप्राचार्य डॉ. सरदार पाटील, कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षक आणि बहुसंख्य विद्यार्थी यांनी सामूहिक वाचन केले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:07 PM 03/Jan/2025

Baguass