चित्रावर बोलायचं नसतं, ते अंतर्मनातून पाहायचं असतं : प्रभाकर कोलते

संगमेश्वर : चित्रकार शिल्पकार प्रकाश राजेशिर्के हे एक प्रयोगशील चित्रकार आहेत. त्यांनी विविध माध्यमात केलेले काम पाहून चित्रकारांनी त्यातून प्रेरणा घेतली पाहिजे. कॅनव्हासवरील चित्राबाबत केवळ बोलायचं नसतं, तर समोरील चित्र फक्त अंतर्मनातून पाहायचं असतं, असं मत प्रसिद्ध चित्रकार प्रभाकर कोलते यांनी व्यक्त केले.

मुंबई येथील जहाँगीर आर्ट गॅलरीत कोकणच्या सावर्डे येथील प्रसिद्ध चित्रकार शिल्पकार प्रकाश राजेशिर्के यांच्या चित्रांच्या प्रदर्शनाचे उद्घाटन प्रसिद्ध चित्रकार प्रभाकर कोलते यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आयोजित कार्यक्रमात कोलते बोलत होते. यावेळी जे. जे. स्कूल ऑफ आर्टचे निवृत्त प्राध्यापक वसंत सोनवणी, प्रकाश भिसे, अरविंद हाटे, युगंधरा राजेशिर्के, मानस राजेर्शिक, शिल्पकार म्हापणकर, मेघा राजेशिर्के, विष्णू परीट, मनोज सकळे, सह्याद्री कला महाविद्यालयाचे प्राचार्य माणिक यादव, रुपेश सुर्वे, अमित सुर्वे आदि उपस्थित होते.

या प्रदर्शनात प्रकाश राजेशिर्के यांच्या विविध माध्यमातील ७० कलाकृती प्रदर्शित करण्यात आल्या आहेत. हे प्रदर्शन ६ जानेवारीपर्यंत कलारसिकांसाठी खुले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:18 PM 03/Jan/2025

Gadre1