आरवली : देवरूख, हरपुडे, कुंडी (कोल्हापूर) या घाट रस्त्याचे स्वप्न पंचक्रोशीतील जनतेने अनेक वर्षांपासून पाहिले होते. हे स्वप्न प्रत्यक्षात उतरवण्यासाठी आमदार शेखर निकम यांनी घेतलेला पुढाकार आणि सातत्याने केलेला पाठपुरावा यामुळे हे स्वप्न साकार होण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.
आमदार शेखर निकम यांनी आपल्या कार्यकाळात या महत्त्वाच्या प्रकल्पासाठी पाच कोटी रुपयांचा निधी मंजूर करून घेतला. निवडणुकीच्या प्रचारसभेत त्यांनी या कामासाठी वचन दिले होते की, निवडणूक संपल्यानंतर दोन-तीन महिन्यांत कामासाठी वर्क ऑर्डर निघेल. या वचनाची पूर्तता करत, २४ डिसेंबर रोजी सर्वेक्षणासाठी आवश्यक वर्क ऑर्डर प्रसिद्ध करण्यात आली असून, मोनार्ज सर्वेअर व इंजिनिअरिंग कन्सलटन्ट प्रा. लि. पुणे कंपनीस हे काम मिळाले आहे. अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या या प्रकल्पाला सुरूवात झाल्याने लोकांनी आमदार शेखर निकम यांचे आभार मानले आहेत. गेले अनेक वर्ष हे काम प्रलंबित होते. ते लवकरात लवकर पूर्ण होवून पूर्ण व्हावे, अशी मागणी होती यासाठी माजी राज्यमंत्री रवींद्र माने तसेच माजी आमदार सुभाष बने यांनी यासाठी यापूर्वी प्रयत्न केले असून, त्यांचेसुद्धा यामध्ये योगदान आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:43 PM 03/Jan/2025













