लांजा : आमदार किरण सामंत यांच्या सूचनेचे पालन करत लांजा बसस्थानकात हिरकणी कक्ष तत्काळ सुरू केला आहे. सरकारी-निमसरकारी कार्यालये, खासगी आस्थापना, संघटित क्षेत्र आणि सार्वजनिक ठिकाणी बाळाला स्तनपान करण्यासाठी मातांसाठी हिरकणी कक्ष सुरू करण्याचे आदेश सरकारने दिले होते. त्यानुसार महापालिकेसह विविध कार्यालयांमध्ये हिरकणी कक्ष सुरू करण्यात आले आहेत; परंतु लांजा बसस्थानकामध्ये असलेला हिरकणी कक्ष जीर्ण झाल्यामुळे आणि नवीन बांधकामात प्रस्तावित असल्याने तो बंद होता. त्यामुळे महिलांची गैरसोय होत होती.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:14 PM 03/Jan/2025














