चिपळूण : वाशिष्ठी डेअरीतर्फे रविवारपासून कृषी महोत्सवाचे आयोजन

शरद पवारांच्या हस्ते होणार उद्घाटन

चिपळूण : वाशिष्ठी डेअरीतर्फे ५ ते ९ जानेवारीदरम्यान बहादूरशेखनाका येथील सावरकर मैदानात कृषी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवाचे उद्घाटन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते आहे, अशी माहिती वाशिष्ठी डेअरी प्रकल्पाचे चेअरमन प्रशांत यादव व मुख्य प्रवर्तक स्वप्ना यादव यांनी दिली.

महोत्सवाचे उ‌द्घाटन ५ जानेवारीला सकाळी १० वा. शरद पवार यांच्या हस्ते होणार आहे. महोत्सवासाठी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील व बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ कुलगुरू संजय भावे यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. या निमित्त रक्तदान शिबिर देखील आयोजित केले. सायंकाळी ५.३० वा. माऊली रिंगण सोहळा, तर ७.३० वा. वाशिष्ठी डेअरी प्रकल्पाचे चेअरमन प्रशांत यादव यांचा सुवर्ण महोत्सवी अभीष्टचिंतन कार्यक्रम होणार आहे. ६ ला सकाळी १० वा. सुदृढ, निरोगी, सुंदर, पशुधन स्पर्धा होईल. तसेच सायं. ४.३० डॉग शो होणार आहे. ७ ला गोड पदार्थ पाककला सकाळी १० ते २ वाजेपर्यंत, कॅट शो सायं. ४.३० ते ६.३० पर्यंत, ८ ला स. ८ वा. सर्वांत जास्त दूध देणारी गाय, म्हैस, १०.३० वा. शेतकऱ्यांना प्रशिक्षण, ११ वा. पशुधन कोकण कपिला स्पर्धा आणि ९ ला सकाळी १० ते २ तिखट पाककला स्पर्धा होईल. चर्चासत्रासाठी विशेष कक्ष, पशुपक्षी व प्राणी प्रदर्शन तर जनावरांचा गोठा विशेष आकर्षण असणार आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
04:06 PM 03/Jan/2025

Mahrashi karve ANM