रत्नागिरी : तालुक्यातील नरबे येथील एका तरुणाने अज्ञात कारणातून राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केली. सचिन प्रकाश पेडामकर (वय ३७, रा. नरबे, रत्नागिरी) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. ही घटना गुरुवारी २ जानेवारी रोजी मध्यरात्रीच्या सुमारास घडली.
गुरुवारी रात्री जेवण आटोपल्यानंतर सचिन आणि त्याचे कुटुंबीय झोपले होते. शुक्रवारी सकाळी सचिनचा भाऊ उठला असता, त्याला सचिन हा घराच्या छताला असलेल्या पंख्याच्या हुकाला साडीने गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसून आला. त्याने आरडाओरड केली असता घरातील इतर नातेवाईकांनी धाव घेतली.
याबाबत ग्रामीण पोलिसांना माहिती देताच त्यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात पाठवला.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:09 AM 04/Jan/2025














