चिपळूण : तालुक्यातील पिंपळी खुर्द येथे दोन लाखांची घरफोडी झाली आहे. अज्ञाताने घरात शिरून सोने- चांदीचे दागिने लंपास केले आहेत. या प्रकरणी संतोष शंकर रिळकर (रा. पिंपळी खुर्द) यांनी चिपळूण पोलिस ठाण्यात दिली आहे. अज्ञात चोरट्याने लोखंडी पहार व कोयतीच्या साहाय्याने घराच्या मागील लोखंडी दरवाजाची जाळी कापून घरात प्रवेश केला व देवघरातील लोखंडी कपाटातील सोन्याचे मंगळसूत्र, हार व रोख रक्कम चोरी करून घरफोडी केली. यामध्ये १ लाख ५ हजारांची सोन्याची चेन, ३५ ग्रॅम वजनाचे मंगळसूत्र, ४५ हजार रुपये किमतीचे एक पेंडल, ३८ हजार रोख रक्कम रुपये चोरली.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:40 AM 04/Jan/2025














