समुद्री साप चावल्याने तरुण जखमी

रत्नागिरी : उमरगाव-पालघर येथील तरुणाला येथील मिरकरवाडा येथील समुद्रात रापणीचे मासेमारी करत असताना समुद्री साप चावला. उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले आहे.

संजय रामजी बरड (वय २८, रा. मिरकरवाडा, रत्नागिरी, मूळ : उमरगाव-पालघर) असे समुद्री साप चावलेल्या तरुणाचे नाव आहे. ही घटना शुक्रवारी (ता. ३) सकाळी सहाच्या सुमारास मिरकरवाडा बंदरात घडली.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, संजय बरड हे मिरकरवाडा येथील सुयोग बोटीवर काम करत होते. मिरकरवाडा बंदरात रापणीतून मासेमारी करत असताना त्यांना समुद्री साप चावला. उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:25 04-01-2025