खेड : परभणी येथील घडलेली घटना, संविधान रक्षक सोमनाथ सूर्यवंशी यांची हत्या, लोकसभेत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबाबत केलेले वक्तव्य अशा पार्श्वभूमीवर खेडमधील आंबेडकरी अनुयायांनी मंगळवारी (ता. ३१) डिसेंबर शक्तिप्रदर्शन करून जनआक्रोश मोर्चा काढला. हजारोंच्या संख्येने आंबेडकरी अनुयायी मोर्चाच्या माध्यमातून घोषणा देत परिसर दणाणून सोडला. तालुका बौद्ध समाजसेवा संघाच्या कार्यालयापासून छत्रपती शिवाजी महाराज चौक, बसस्थानकमार्गे वाणीपेठ, गांधी चौक, तीनबत्ती नाकामार्गे जिजामाता उद्यान येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून मोर्चा तहसील कार्यालयावर धडकला. त्यानंतर प्रशासनाला निवेदन देण्यात आले. या वेळी दलितमित्र दादासाहेब मर्चडे, प्रितम रूके, तालुका सरचिटणीस सुरेंद्र तांबे, शहराध्यक्ष दीपेंद्र जाधव आदी उपस्थित होते.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:42 AM 04/Jan/2025














