चिपळुणात आज महायुतीचा आभार सोहळा

चिपळूण : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे चिपळूण-संगमेश्वर विधानसभा मतदारसंघाचे आमदार शेखर निकम यांच्या शनिवार ४ रोजी सकाळी ११ वा. खेंड महालक्ष्मी नगर येथील राधाताई लाड सभागृहात आभार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असून राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून महायुतीच्या सहकार्याने आ. शेखर निकम यांचा यावेळी सन्मान व आभार सोहळा होणार आहे.

महायुतीच्या चिपळूण-संगमेश्वर माध्यमातून विधानसभा मतदारसंघात दुसऱ्यावेळी विजयी झालेले राष्ट्रवादीचे आ. शेखर निकम यांचा नागरी सत्कार तसेच महायुतीच्या माध्यमातून आभार सोहळा शनिवारी सकाळी ११ वा. राधाताई लाड सभागृहात आयोजित करण्यात आला आहे. या सोहळ्याला महायुतीमधील भाजपचे गुहागरचे माजी आ. डॉ. विनय नातू, शिवसेना उपनेते व माजी आ. सदानंद चव्हाण, रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष डॉ. तानाजी चोरगे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बाबाजी जाधव, प्रशांत मोहिते आदी प्रमुख मान्यवर उपस्थित राहाणार आहेत.

विजयाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात महायुतीचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, सामाजि व शैक्षणिक संस्था, व्यापारी, महिला मंडळ, सर्व हितचिंतकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन नियोजन समितीच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी केले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:58 AM 04/Jan/2025

Sahyog multi.