रत्नागिरी : नवलाई नगर परिसरातील पाण्याच्या समस्येबाबत स्थानिक नागरिकांसह भाजपा पदाधिकाऱ्यांची नगरपालिकेवर धडक

रत्नागिरी : नगरपालिका परिषद हद्दीतील प्रभाग क्रमांक ५ नवलाई नगर परिसरातील दुर्वांकुर अपार्टमेंट येथील रहिवासी महिलांना गेले अनेक दिवस पाण्याच्या समस्येला तोंड द्यावे लागत आहे. अतिशय कमी दाबाने पाणीपुरवठा होत असून सहकार नगर येथील पाण्याच्या टाकीला लागलेली गळती यामुळे प्रभाग क्रमांक ५ व ६ परिसरात याचा परिणाम होत असल्याचे देखील बोलले जात आहे. याबाबत रहिवाशांनी भाजपा पदाधिकारी यांना माहिती दिली. त्यानंतर तेथील नागरिकांसह भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी नगरपालिकेवर धडक दिली आणि निवेदन देऊन पाण्याच्या समस्येवर लवकरात लवकर उपाययोजना करण्याची मागणी केली.

शहरातील नवलाईनगर दुर्वांकुर अपार्टमेंटमधील रहिवाशांना गेले अनेक दिवस पाण्याच्या समस्येला तोंड द्यावे लागत आहे. अतिशय कमी दाबाने पाणीपुरवठा होत असून महिला वर्ग त्रासला होता. सहकार नगर येथील पाण्याच्या टाकीला लागलेली गळती यामुळे प्रभाग क्रमांक ५ व ६ परिसरात याचा परिणाम होत असावा असा कयास आहे. या समस्येबाबत तेथील महिलांनी भाजपाच्या सायली बेर्डे यांना माहिती दिली. त्यानंतर तेथील स्थानिक महिलांसह भाजपा पदाधिकारी सौ. सायली बेर्डे, सौ. भक्ती दळी यांनी रत्नागिरी नगर परिषदेमध्ये भेट दिली.

यावेळी उपमुख्याधिकारी श्री. चाळके यांच्याशी याबाबत चर्चा केली. यावेळी सौ. लीना हेमंत सुद्रिक, वेदा देवळेकर, सौ. विनोद किरण चुंबळकर, सौ. अर्चना मुकुंद मराठे, सौ. चारुशीला रवींद्र डोंगरे, सौ. जान्हवी नितीन जागुष्टे, सौ. स्नेहल सत्यविनायक मुळे, सौ. कोमल तेंडुलकर, शहर महिला मोर्चाचा खजिनदार सौ. सायली बेर्डे, महिला मोर्चाचा जिल्हा चिटणीस सौ. भक्ती दळी आदींनी भाजपा जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांच्या मार्गर्शनाखाली नगर पालिकेचे उपमुख्याधिकारी श्री. चाळके यांना निवेदन देत नवलाई नगर प्रभाग क्रमांक ५ मधील दुर्वांकुर अपार्टमेंट मधील रहिवाशी यांच्या समस्या मांडल्या. लवकरच याबाबत उपाययोजना केली जाईल असे आश्वासन यावेळी उपस्थितांना देण्यात आले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:03 PM 04/Jan/2025