रत्नागिरी : पटवर्धन हायस्कूलच्या नववीच्या विद्यार्थ्यांची सोमेश्वर विश्वमंगल गोशाळेस भेट

सोमेश्वर (ता. रत्नागिरी): पटवर्धन हायस्कूलच्या इयत्ता नववीच्या विद्यार्थ्यांनी सोमेश्वर येथील गोशाळा व गोविज्ञान केंद्रास भेट देत पर्यावरण, गोमातेचे महत्त्व, व गोशाळेतील विविध उपक्रमांची माहिती घेतली.

या शैक्षणिक क्षेत्रभेटीत विद्यार्थ्यांना सोमेश्वर शांतीपीठ ट्रस्टचे ट्रस्टी श्री. राजेश आयरे, प्रा. अशोक पाटील, प्रकाश मुळे, विनायक हातखंबकर, सौ.अनुजा पेटकर मॅडम, सौ छायाताई अनावकर श्री.विनोद पेटकर , श्री विलास सावंत सर, राकेश वाघ सर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.

बालिका दिनाचे औचित्य साधून प्रतिनिधी स्वरूपात शिक्षिका आणि एका विद्यार्थिनीचा शाल श्रीफळ देऊन गोशाळेमार्फत सत्कार करण्यात आला.

विद्यार्थ्यांना विश्वस्त श्री अशोक पाटील यांनी गोशाळेची माहिती दिली, राकेश वाघ आणि विलास सावंत यांनी यासाठी मदत केली.
सौ.अनुजा पेठकर यांनी विद्यार्थ्यांना गोशाळेत तयार होणाऱ्या उत्पादनांची माहिती दिली. सौ छायाताई अनावकर,श्री प्रकाश मुळे यांनी मदत केली. विश्वस्थ श्री विनायक हातखंबकर यांनी सर्व विद्यार्थ्यांना अल्पोपाहार दिला. सर्व कार्यक्रमात श्री विनोद पेठकर यांनी मोलाचा सहभाग दिला.

कार्यक्रमाची सुरुवात प्रा. अशोक पाटील यांच्या प्रार्थनेने झाली. श्री. राजेश आयरे यांनी गोमातेचे महत्त्व सांगत विद्यार्थ्यांना गोशाळेतील संस्कृती व पर्यावरणपूरक जीवनशैलीविषयी मार्गदर्शन केले. यामध्ये भविष्यात येथे सुरू होणारी निसर्गोपचार केंद्र ,योगोपचार केंद्र, महिलांसाठी कौशल्य प्रशिक्षण केंद्र, आनंदाश्रम व व गुरुकुल या विविध प्रस्ताविक उपक्रमांची माहिती दिली.प्रकाश मुळे यांनी गोशाळेचा परिसर विद्यार्थ्यांना दाखवत विविध उत्पादनांची माहिती दिली. पेटकर मॅडम व सौ.छायाताई यांनी गोशाळेतील उत्पादने व त्यांचा उपयोग याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. प्रा.श्री अशोक पाटील सर यांनी गो शाळेतील गाईविषयी माहिती दिली त्यांच्या सवयी त्यांचा आहार व रत्नागिरी शहरात भटक्या अवस्थेत असल्यामुळे त्यांची होणारी अनास्था याबद्दल काळजी घेण्याचे आवाहन या निमित्ताने उपस्थित विद्यार्थ्यांना त्यांनी केले. श्री विनायक जी हातकमकर सर यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना बालिका दिनानिमित्त मार्गदर्शन केले. सोमेश्वर शांतिपीठ विश्वमंगल गोशाळेच्या बद्दल माहिती दिली.

सावित्रीबाई फुले जयंतीचे औचित्य साधून या कार्यक्रमाच्या निमित्ताने सावित्रीबाई फुले जयंती व कन्या दिन साजरा करण्यात आला. ट्रस्टतर्फे एका विद्यार्थिनी व एका शिक्षिकेचा शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. तसेच ट्रस्टी विनायक हातखंबकर यांनी विद्यार्थ्यांना फळे व मिठाई वाटून सन्मान व्यक्त केला.

या क्षेत्रभेटीत पटवर्धन हायस्कूलच्या शिक्षकांचा मोलाचा सहभाग होता. श्री. अजित मुळीक सर, हेमाताई गुरव, माधवी तेंडुलकर, मिरगल मॅडम, तसेच गुरुकुल विभागामार्फत मीनाताई पाखरे व कशाळकर मॅडम यांनी क्षेत्रभेट यशस्वी होण्यासाठी उत्तम सहकार्य केले.

इयत्ता नववीचे पालक प्रतिनिधी सानिक ठीक मॅडम व वाडेकर मॅडम यांनी उत्साहाने या क्षेत्रभेटीत सहभाग घेतला.

विद्यार्थ्यांनी या भेटीद्वारे निसर्ग, पर्यावरण व गोशाळेचे महत्त्व समजून घेतले. ही शैक्षणिक क्षेत्रभेट सर्वांसाठी प्रेरणादायी ठरली.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:30 04-01-2025