रत्नागिरी जिल्ह्याला मिळाले १० सहायक सरकारी वकील

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यातील प्रथम वर्ग दंडाधिकाऱ्यांच्या न्याय न्यायालयांसाठी दहा सहायक सरकारी वकील (गट अ) नियुक्त झाले आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून या न्यायालयांमध्ये विशेष सहायक सरकारी वकील काम पाहत होते. आता हे नवीन सहाय्यक सरकारी वकील रुजू होतील, तेव्हा दहा विशेष सहाय्यक सरकारी वकीलांची पदे संपुष्टात येणार आहेत.

रत्नागिरी जिल्ह्यामध्ये १७ प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी (जेएमएफसी) न्यायालय आहेत. यातील दापोलीतील १ नंबर न्यायालयासाठी गणेश अचारी, लांजातील १ नंबर न्यायालयासाठी सुनील वळवी, खेडमधील १ नंबर न्यायालयासाठी विद्या गायकवाड आणि २ नंबर न्यायालयासाठी अनुराधा सोळंकी यांची नियुक्ती झाली आहे.

देवरुखातील १ नंबर न्यायालयासाठी अशोक दुड्ढेकर, चिपळूण १ नंबर न्यायालयासाठी तृष्णा तळेकर, राजापुरातील १ नंबर न्यायालयासाठी भालचंद्र सुपेकर यांची नियुक्ती झाली आहे.

रत्नागिरीतील १ नंबर न्यायालय आणि बाल न्यायालयासाठी जागृती हुमणे, २ नंबर न्यायालयासाठी सुनील गवळी आणि ३ नंबर न्यायालयासाठी सारिका शेळके या सहाय्यक सरकारी अभियोक्त्यांची नियुक्ती झाली आहे. जसजसे हे नवीन सरकारी वकील न्यायालयांमध्ये हजर होतील तसतशी तेथील विशेष सहाय्यक सरकारी वकील पदे रिक्त होत जाणार आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:29 AM 06/Jan/2025