रत्नागिरी : जिल्हा परिषद इमारतीमधील लिफ्ट बंद

रत्नागिरी : जिल्हा परिषद भवनाच्या इमारतीत असलेली लिफ्ट मागील आठ दिवस बंद स्थितीत असल्याने कामानिमित्त येणाऱ्या अपंग, वयोवृद्ध व्यक्तींना जिन्यावरुनच चालत जावे लागत आहे. यामुळे त्यांना त्रासाला सामोरे जावे लागत आहे. वर्षभरापूर्वी कोट्यवधी रुपये खर्च करून नवीन लिफ्ट बनवण्यात आली होती.

जिल्हा परिषदेला मिनी मंत्रालय म्हणून ओळखले जाते. कामानिमित्त दररोज जिल्ह्याभरातून अनेक नागरिक जिल्हा परिषदेमध्ये येत असतात. जि.प.ची इमारत ३ मजली आहे. या इमारतीमध्ये जिना आहे, त्याचबरोबर अपंग तसेच वयोवृद्ध व्यक्तींना आणि कर्मचाऱ्यांना येण्या जाण्यासाठी लिफ्टची सोय करण्यात आलेली आहे.

या इमारतीमध्ये वर्षभरामध्ये कोट्यवधी रुपये खर्च करुन नवीन लिफ्ट करण्यात आली होती. मात्र वर्षभरात ती बंदसुद्धा पडली आहे. गेली आठ दिवस ती बंद स्थितीत असल्यामुळे अपंग व्यक्ती तसेच वयोवृद्ध व्यक्तींना त्रासाला जावे लागत आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:37 AM 06/Jan/2025