अखिल भारतीय मराठा महासंघ चिपळूण युवक तालुकाध्यक्षपदी विक्रांत चव्हाण यांची निवड

चिपळूण : तालुक्यातील उभळे येथील विक्रांत चव्हाण यांची अखिल भारतीय मराठा महासंघ चिपळूण – गुहागर युवक तालुका अध्यक्षपदी नुकतीच निवड झाली. या निवडीचे पत्र राष्ट्रीय अध्यक्ष दिलीप जगताप, सरचिटणीस महामुंबई महेश सावंत, रत्नागिरी जिल्हाध्यक्ष संदीप सावंत यांनी चव्हाण यांच्याकडे नुकतेच सुपूर्द केले.

उभळे येथील युवा कार्यकर्ते विक्रांत चव्हाण यांनी शेतकऱ्यांना वेळोवेळी मदत, शैक्षणिक साहित्य वाटप, मोफत रुग्णवाहिका सेवा, स्वखचनि रस्ते असे कार्य केले आहे. ते शिवसेना युवासेना गुहागर तालुकाप्रमुख पदी कार्यरत आहेत. या कामाची दखल घेऊन अखिल भारतीय मराठा महासंघाने विक्रांत चव्हाण यांच्यावर चिपळूण-गुहागर युवक तालुकाध्यक्ष पदाची जबाबदारी सोपवली आहे. निवडीचे पत्र देताना रत्नागिरी जिल्हा संपर्कप्रमुख विवेक कदम, मुंबई अध्यक्ष धोंडू जाधव, मुंबई सरचिटणीस बाळकृष्ण लाड, नवी मुंबई अध्यक्ष दिलीप चव्हाण, तालुका संपर्कप्रमुख किशोर जनार्दन घाग, चेंबूर शाखाध्यक्ष किशोरी कडू, लता निकम आदी उपस्थित होते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:45 AM 06/Jan/2025

Arihant 3