कडवई : शिव-फुले-शाहू-आंबेडकर विचारांवर चालणाऱ्या तरुणांनी एकत्र येऊन संगमेश्वर तालुक्यातील तांबेडी येथे जयभीम स्तंभ उभारला आहे. याच्या उद्घाटन सोहळ्याला वाशिष्टी प्रकल्पाचे अध्यक्ष प्रशांत यादव, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संतोष थेराडे, राजेंद्र ब्रीद, युवा नेतृत्व अजिंक्य ब्रीद, हेदली गावचे पोलीस पाटील नरेंद्र खानविलकर उपस्थित होते. यावेळी प्रशांत यादव यांनी सुरज सावंत, रुपेश तांबे, विनोद सावंत, अभिजित तांबे, सागर सावंत, सुदेश सावंत, सचिन गमरे, शुभम सावंत, अजय सावंत यांनी तांबेडी बौद्धवाडीच्या विकास कामांसाठी पुढाकार घेतला आहे. अशा तरुणांची समाजाला आणि गावाला गरज आहे असे मत व्यक्त केले. भव्य जयभीम स्तंभाला विनामूल्य जागा दिल्याबद्दल महेश खामकर यांचे विशेष आभार मानण्यात आले. या कार्यक्रमाला गावातील ग्रामस्थ मंडळी आणि प्रशिक सेवा संघ तांबेडी या संघटनेचे कार्यकर्ते आणि सभासद उपस्थित होते.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:01 PM 06/Jan/2025














