साने गुरुजी प्रेरणा प्रकल्पासाठी कोकण विभागातून हर्चेतील त्रिधा भरणकर प्रथम

पावस : साने गुरुजी यांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त राष्ट्र सेवा दल व अन्नपूर्णा परिवार (पुणे) आयोजित राज्यस्तरीय ‘साने गुरुजी प्रेरणा प्रकल्प’ ९ वी ते १२ वीच्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित केला होता. त्यामध्ये बॅ. नाथ पै विद्यालय व ज्यु. कॉलेज हर्चेच्या त्रिधा चंद्रकांत भरणकर या विद्यार्थिनीने ‘कोकण विभागातून प्रथम क्रमांक’ पटकाविला आहे.

साने गुरुजी प्रेरणा प्रकल्पासाठी तिने भडे (ता. लांजा) आणि पंचक्रोशीत जतन केल्या जाणाऱ्या भारतीय संस्कृती परंपरा व सर्वधर्मीय उत्सवांचे वैशिष्ट्य याविषयी विवेचन केले होते. त्यासाठी विद्यालयाचे शिक्षक गणेश मुळ्ये, उदय पाटील व प्रा. स्वाती शिंदे यांचे मार्गदर्शन लाभले. या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष भाई मयेकर, मुख्याध्यापक बाळासाहेब सरक, माजी मुख्याध्यापक आनंदकुमार जाधव, व्ही. डी. पाटील, जे. एम. पाटील, व्ही. पी. पाटील यांच्यासह हर्चे-भडे-बेनी ग्रामस्थांनी तिचे कौतुक केले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:43 PM 06/Jan/2025