आवडत्या क्षेत्रात जिद्द ठेवल्यास यश मिळेल : महेश कोकाटे

लांजा : सध्याच्या स्पर्धात्मक युगामध्ये नावलौकिकता मिळवायची असेल, टिकून राहायचे असेल तर कोणताही न्यूनगंड बाळगू नये, ज्या क्षेत्राची आवड आहे, त्या क्षेत्रात विद्यार्थ्यांनी सातत्य, मेहनत आणि जिद्द कायम राखल्यास यशाला सहज गवसणी घालता येते, असे प्रतिपादन प्रसिद्ध चित्रपट अभिनेते महेश कोकाटे यांनी लांजा तालुक्यातील वेरवली बुद्रुक येथे केले.

लांजा तालुक्यातील श्रीराम विद्यालय वेरवली बुद्रुक येथे वेरवली पंचक्रोशी शिक्षण मंडळाच्यावतीने शनिवारी जिल्हास्तरीय पुरस्कार वितरण सोहळा आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी सुप्रसिद्ध अभिनेते महेश कोकाटे प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते. या सोहळ्याप्रसंगी राजापूर-लांजा- साखरपाचे आमदार किरण सामंत, वेरवली पंचक्रोशी शिक्षण मंडळ संस्थेचे अध्यक्ष मारुती डोळस, रोहिणी डोळस, कार्याध्यक्ष सुभाष राणे, सचिव संतोष पडवणकर, सिने-नाट्य अभिनेते अमोल रेडीज, मनीष कोकाटे, संचालक शैलेश डोळस, रवींद्र डोळस, सुरेश चव्हाण, मुख्याध्यापक अरुण डोळे आदी उपस्थित होते.

आ. किरण सामंत यांनी प्रमुख अतिथी म्हणून बोलताना सांगितले की, वेरवली शिक्षण संस्थेचे काम आदर्शवत सुरू आहे. वेरवली शिक्षण संस्थेच्या प्रत्येक उपक्रमासाठी शालेय सर्वांगीण विकासासाठी, शैक्षणिक, कला, क्रीडा व सांस्कृतिक विभाग उंचावण्यासाठी नेहमी प्रयत्नशील राहणार असल्याचा विश्वास दिला.

सुभाष लाड, साक्षी पडवणकर, आबा सुर्वे, प्रविण कांबळे, विजय हटकर, सुभाष बोडस, शिवाप्पा उकली, तेजस्विनी आचरेकर, भाई जोशी, महिलाश्रम लांजा यांना अभिनेते महेश कोकाटे यांच्याहस्ते पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. या कार्यक्रमाला लांजा न्यु एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष जयवंत शेट्ये, माजी मुख्याध्यापक विजय बेर्डे, विद्या बेलवलकर, माजी नगराध्यक्षा संपदा वाघधरे, जयवंत जाधव, सुरज कुडतडकर, पंढरी गुरव उपस्थित होते. प्रास्ताविक अमोल रेडीज यांनी सूत्रसंचालन विनोद बंडगर, सचिन कांबळे केले. आभार मुख्याध्यापक अरुण डोळे यांनी मानले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:11 PM 06/Jan/2025