चिपळूण : डेरवण येथील क्रीडा संकुलात ८ रोजी जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धा

सावर्डे : प्राथमिक शिक्षण विभाग जिल्हा परिषद रत्नागिरी यांच्या वतीने जिल्हा परिषद प्राथमिक शाळांतील विद्यार्थ्यांच्या वार्षिक क्रीडा स्पर्धा ८ रोजी सकाळी ८:३० वाजता डेरवण येथील श्री विठ्ठलराव जोशी चॅरीटेबल ट्रस्टच्या क्रीडा संकुलात होणार आहेत. तसेच ९ रोजी सायंकाळी ४ वाजता क्रीडा स्पर्धांचा पारितोषिक वितरण समारंभ होणार आहे. या स्पर्धेचे उद्घाटन राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांच्याहस्ते होणार आहे. यावेळी गृह (शहर) राज्यमंत्री योगेश कदमही वितरण सोहळ्यास उपस्थित उपस्थित राहणार आहेत. त्याचबरोबरच खासदार सुनील तटकरे, खासदार नारायण राणे, आमदार निरंजन डावखरे, आ. प्रसाद लाड, आ. भास्कर जाधव, ज्ञानेश्वर म्हात्रे, आ. किरण सामंत, आ. शेखर निकम, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्ती किरण पुजार, जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह, श्री विठ्ठलराव जोशी चॅरिटेबल ट्रस्टच्या वैद्यकीय संचालिका डॉ. सुवर्णा पाटील, संचालक श्रीकांत पराडकर, जिल्हा क्रीडा अधिकारी विजय शिंदे उपस्थित राहणार आहेत. तरी उद्घाटन व पारितोषिक वितरण सोहळ्यात उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हा परिषद शिक्षणाधिकारी (योजना) किरण लोहार, शिक्षणाधिकारी (माध्यमिक) सुवर्णा सावंत, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) बी. एस. कासार, उपशिक्षणाधिकारी (प्राथमिक) सुनिता शिरभाते यांनी केले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:33 PM 07/Jan/2025

Gadre2