मारळ येथे पोलिस चेक नाका सुरु

साखरपा : संगमेश्वर तालुक्यातील मारळ येथे पोलिस चेक नाका सुरु झाला आहे. यामुळे गुरांची होणारी अवैध वाहतूक रोखण्यास याचबरोबर संशयित वाहनांवर लक्ष ठेवण्यास आता मदत होणार आहे.

त्याचबरोबर मुर्शी येथील पोलीस चेक नाकाही अधिक कडक करणार असून या ठिकाणावरून जाणारी गुरांची अवैध वाहतूक रोखणार असून अन्य संशयित वाहनांवर लक्ष ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. समाजात कायदा व सुव्यवस्था, शांतता राखण्याच्या दृष्टीने सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचे देवरुख पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक अतुल जाधव यांनी सांगितले. जनतेने संशयित व्यक्ती, वस्तू अथवा वाहन दिसून आल्यास त्वरित जवळच्या पोलिस चौकीशी संपर्क करण्याचे आवाहन देखील करण्यात आले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:53 07-01-2025

Gadre3