लांजा : तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेत देवधे मणचे शाळेने पटकावले लंगडी चे विजेतेपद

लांजा : तालुकास्तरीय हिवाळी क्रीडा स्पर्धेत मोठा गट लंगडी या क्रीडा प्रकारात देवधे मणचे शाळेने विजेतेपद पटकावले.

सदर तालुकास्तरीय क्रिडा स्पर्धा कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय लांजा या ठिकाणी संपन्न झाल्या.

यामध्ये लांजा, पुनस, भांबेड आणि शिपोशी प्रभागातील खेळाडूंनी सहभाग घेतला होता. मोठा गट लंगडी या क्रीडा प्रकारात शिपोशी प्रभागाचे नेतृत्व देवधे मणचे शाळेतील विद्यार्थ्यांनी करीत होत्या. यावेळी प्रथम लांजा प्रभाग यांना पराजित करून अंतिम सामन्यात भांबेड प्रभागास पराजित करून देवधे मणचे शाळेने विजेतेपदाचा बहुमान पटकावला.

दिनांक 8 जानेवारी रोजी डेरवण (ता. चिपळूण) येथे होणाऱ्या जिल्हास्तरीय शालेय हिवाळी क्रीडा स्पर्धेमध्ये लंगडी या क्रीडा प्रकारामध्ये जिल्हा परिषद शाळा देवधे लांजा तालुक्याचे नेतृत्व करणार आहे. या क्रीडा प्रकारांमध्ये उज्वल यश संपादन करणार्या विद्यार्थ्यांना मुख्याध्यापक संतोष जाधव, नंदकुमार पाटोळे , सौ सायली तिखे आणि नानासाहेब गोरड यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.

सदर विजयाबद्दल माजी शिक्षण सभापती मणचेकर आणि व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संजय खेगडे यांनी विजेत्या खेळाडूंचे अभिनंदन केले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
15:16 07-01-2025