रत्नागिरी : स्वच्छतेची सवय अंगीकृत करण्यासाठी कुटुंबस्तरावर स्वच्छ माझे अंगण अभियान जिल्हा परिषदेमार्फत राबविण्यात येणार आहे. १ ते २६ जानेवारी या कालावधीत उत्कृष्ट स्वच्छता करणाऱ्या कुटुंबांचा जिल्हा परिषद प्रशासनाकडून गौरव केला जाणार आहे, असे मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्तीकिरण पुजार यांनी सांगितले.
स्वच्छ भारत मिशन (ग्रा) दापा २ अंतर्गत वैयक्तिक शौचालय, घनकचरा व्यवस्थापन, सांडपाणी व्यवस्थापन (कुटुंबस्तर) या बाबींची प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी प्रशासनही गंभीर झाले आहे. पिलर नियमाने स्वच्छतेच्या चाधींची सवय अंगीकृत करण्यासाठी जे कुटुंब सांडपाणी व्यवस्थापनाकरिता शोषखड्डा, वैयक्तिक शौचालय, घनकचरा व्यवस्थापनाकरिता कंपोस्ट खतखड्डा, कुटुंबस्तरावर कचराकुंड्या याची उपलब्धता करून त्यांचा नियमित वापर करणाऱ्या कुटुंबाना प्रोत्साहन देण्यासाठी प्रशासन प्रत्येक कुटुंबापर्यंत पोचणार आहे. अशा कुटुंबांचे अनुकरण इतर ग्रामस्थांनी, कुटुंबधारकांनी करावे आणि वैयक्तिक स्वरुपाच्या स्वच्छतेच्या सुविधा आपल्या घरात किंवा परिसरात व उपलब्ध करून घ्याव्यात यासाठी स्वच्छ माझे अंगण अभियान गावागावात राविण्यात येत आहे. या अभियानाची माहिती देण्यासाठी गावात दवंडी पिटणे, ग्रामपंचायत कार्यालयांच्या ठिकाणी फलक लावून प्रसिद्ध केली गेली आहे.
शासनाने जाहिर केलेल्या निकषांच्या अनुषंगाने निवड केलेल्या कुटुंबांची यादी ग्रामपंचायत कार्यालयाच्या सूचना फलकावर लावत जाणार आहे. त्याचबरोबर संबंधित कुटुंब अभियानात पात्र झाले असल्याबावतचे पत्रही पाठविण्यात येणार आहे. उत्कृष्ट व्यवस्थापन करणाऱ्या कुटुंबांना २६ जानेवारी रोजी ग्रामपंचायत ग्रामसभेत सरपंच व ग्रामसेवक यांच्या संयुक्त स्वाक्षरीने प्रशस्तिपत्र देऊन सन्मानित केले जाणार आहे.
हे करणे आवश्यक
अभियानाची अंमलबजावणी करताना वैयक्तिक शौचालयाचा नियमित वापर करणे, शौचालयाची दैनंदिन स्वच्छता, शाश्वत स्वरूपात सर्व कुटुंब सदस्याकडून वापर आणि ही सुविधा निरंतर टिकावी म्हणून आवश्यक ती देखभाल दुरुस्ती करण्यात कुटुंबांचा पुढाकार, कुटुंबस्तरावर दैनंदिन घनकचऱ्याचे वर्गीकरण करणे, कुटुंबस्तरावर सुका कचरा-ओला कचरा कुंड्यांमध्ये वर्गीकरण करणे, वर्गीकृत घरगुती कचऱ्याचे कंपोस्ट खत वनविणे, घर परिसरात कचऱ्याचे व्यवस्थापन करणे, सांडपाणी व्यवस्थापन (कुटुंबस्तरावर) करणे, या गोष्टीची प्रत्यक्षात अंमलबजावणी झाली किंवा नाही हे पाहिले जाणार आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:50 PM 07/Jan/2025












