गुहागर-विजापूर महामार्गावरील खड्डे बुजविण्यासाठी आ. भास्कर जाधव यांनी दिल्या सूचना

गुहागर : गुहागर-विजापूर राष्ट्रीय महामार्गावरील गुहागर शहरापासून तीन किलोमीटरच्या रस्त्याला पडलेल्या खड्यांबाबत गुहागरचे आमदार भास्कर जाधव यांनी दिलेल्या पत्राची तत्काळ दखल घेत राष्ट्रीय महामार्ग विभागाचे उपविभागीय अभियंता यांनी संबंधित ठेकेदाराला या मार्गावरील खड्डे तत्काळ डांबराने बुजवावेत, अशा सूचना केल्या आहेत.

गुहागर चिपळूण कराड राष्ट्रीय महामार्ग क्रमांक १६६ ई वरील गुहागर शहरापासून शृंगारतळीकडे जाणाऱ्या तीन किलोमीटरच्या रस्त्याची खड्यांमुळे दुरवस्था झाली आहे. त्यामुळे त्याची तत्काळ डागडुजी करावी, असे पत्र आमदार जाधव यांनी राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले होते. यावर या विभागाचे उपअभियंता नाजीम मुल्ला यांनी या कामाचे ठेकेदार असलेल्या मे. मनीषा कन्स्ट्रक्शन कंपनी आणि राज कन्स्ट्रक्शन या कंपनीला पत्र पाठवून येत्या २-३ दिवसांत खराब रस्त्याची डागडुजी डांबराने करून मंजूर निविदा अटी- शर्तीनुसार व करारनामाप्रमाणे रस्ता सुस्थितीत ठेवावा, असा इशाराही त्यांनी ठेकेदार कंपनीला दिला आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:30 AM 08/Jan/2025