अडूरमधील ‘तो’ वाद दीड वर्षापासून सुरू : पोलिस निरीक्षक सचिन सावंत

गुहागर : अडूरमधील वाद हे दीड वर्षांपूर्वीपासूनचे आहेत. त्याबाबतची अनेक पत्रे पोलिस ठाण्यात उपलब्ध आहेत. सामाजिक वाद चर्चेतून सुटावेत यासाठी अनेकवेळा आम्ही प्रयत्न केले; मात्र संबंधित गट कधीच उपस्थित राहात नाही, तरीही सर्वांना पूजापाठ करण्यासाठी पोलिस प्रशासनाने कधीही अडवले नाही, केवळ कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, म्हणून मोठ्या कार्यक्रमांना आम्ही परवानगी दिली नाही, अशी प्रतिक्रिया गुहागरचे पोलिस निरीक्षक सचिन सावंत यांनी दिली. अडूरमधील बौद्धजन सहकारी संघ शाखा क्र. ४० यांनी केलेल्या आरोपांबाबत सावंत यांनी सांगितले, की अडूरमध्ये बदलीची मागणी करणारा मोठा गट आहे आणि या गटाविरुद्ध तक्रार करणारा छोटा गट आहे. ७ फेब्रुवारी २०२४ ला या दोन गटांमध्ये माता रमाई जयंतीच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमांवरून वाद झाला होता. याबाबत छोट्या गटाने तक्रार दाखल केली होती.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:39 AM 10/Jan/2025