खेड स्थानकात एक्झिक्युटिव्ह लाऊंजचा प्रारंभ

खेड : कोकण रेल्वेच्या खेड स्थानकात एक्झिक्युटिव्ह लाऊंजचा प्रारंभ करण्यात आला. कोकण रेल्वेचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक संतोषकुमार झा यांच्या हस्ते फित कापून तर मुख्य वाणिज्य प्रबंधक आशुतोष श्रीवास्तव, रत्नागिरी विभागीय व्यवस्थापक शैलेश बापट, उपमुख्य वाणिज्य प्रबंधक राजेंद्र घोलप आणि कोकण रेल्वेच्या विविध अधिकार्‍यांच्या उपस्थितीत करण्यात आला.

या वातानुकूलित एक्झिक्युटिव्ह लाउंजमध्ये प्रवाशांच्या सुविधेपकरिता 22 आरामदायी आसनांची व्यवस्था करण्यात आली आहे. येथे उपलब्ध स्क्रीन वर प्रवाशांना मार्गावर धावणार्‍या विविध गाड्यांच्या आगमन निर्गमनाची माहिती उपलब्ध होणार आहे. प्रवाशांसाठी येथे छोटेखानी कॅफेटेरिया सुविधाही असणार आहे. कोकण रेल्वेच्या रत्नागिरी विभागात चिपळूणपाठोपाठ एक्झिक्युटिव्ह ला ऊंज उपलब्ध असलेले खेड दुसरे स्थानक बनले आहे. येणार्‍या काळात कोकण रेल्वेच्या मार्गावर प्रवाशांसाठी विविध सुविधा उपलब्ध करून देत आहोत. कोकण रेल्वे मार्गावर येणार्‍या वर्षात अशा पद्धतीची सहा ते सात एक्झिक्युटिव्ह लाऊंज सुरू करण्याचा निर्धार आहे, असा विश्वास यावेळी कोकण रेल्वेचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक संतोषकुमार झा यांनी व्यक्त केला.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:19 13-01-2025