गुहागर तालुका बळीराज सेनेच्या अध्यक्षपदी अरुण भुवड यांची निवड

गुहागर : बळीराज सेना पक्षप्रमुख अशोक वालम यांच्या आदेशानुसार गुहागर विधानसभा मतदार संघ संपर्कप्रमुख शरद बोबले व नवनिर्वाचित तालुका संपर्क प्रमुख संतोष निवाते यांच्या मार्गदर्शनानुसार गुहागर तालुका बळीराज सेनेत विशेष फेरबद्दल करण्यात आले आहेत. गुहागर तालुका अध्यक्षपदी वरवेली येथील अरुण भुवड तर उपाध्यक्षपदी पाभरे येथील संतोष पास्टे यांची निवड केली आहे. सचिवपदी कायदेतज्ज्ञ दिनेश कदम, खजिनदारपदी पालशेतचे उद्योजक संतोष गोरीवले व सहखजिनदार म्हणून वेळणेश्वर येथील प्रमोद देवळे यांची नियुक्ती पक्षाने केली आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:23 PM 13/Jan/2025

Shanti2