चिपळूण मध्यवर्ती बसस्थानकात हिरकणी कक्षाचे उद्घाटन

चिपळूण : मध्यवर्ती बसस्थानक चिपळूण येथे महिलांच्या सोयींसाठी आणि त्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी गरजेच्या सुविधांनी युक्त हिरकणी कक्षाचे उद्घाटन नुकतेच झाले. यावेळी पोलिस उपनिरीक्षक मेहेर, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. ज्योती यादव यांनी कक्षाचे उद्घाटन केले.

यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून एक्सेल इंडस्ट्रीजचे श्रीपाद देशपांडे, विनती ऑरगॅनिकचे पीआरओ सचिन खरे, नेरोलॅकचे नंदन सुर्वे उपस्थित होते. रोटरी क्लब चिपळूणचे अध्यक्ष अविनाश पालशेतकर यांनी कक्षाच्या उद्दिष्टांची माहिती दिली.

उद्घाटन समारंभाला मध्यवर्ती बसस्थानकाचे आगारप्रमुख दीपक चव्हाण, अर्चना ठसाळे, वाहतूक निरीक्षक सानिया हातकमकर, रश्मी सुर्वे, आगार लेखाकार मनोरकर, सुशांत मोहिते, अमोल मोहिते, मंगेश माटे व राजेश नारकर, तसेच राजेश ओतारी उपस्थिीत होते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:12 PM 14/Jan/2025