राजापूर : अणसुरे खाडीतील कच उत्खननाप्रकरणी घटनास्थळी भेट देऊन प्रत्यक्षदर्शी पाहणी करून याबाबचा सविस्तर अहवाल प्रांताधिकारी यांच्याकडे सादर करण्यात आल्याची माहिती येथील तहसीलदार विकास गंबरे यांनी दिली आहे. अणसुरे खाडीमध्ये उत्खनन झाल्याचे आढळून आले. या ठिकाणी उत्खनन करण्यासाठी कोणताही परवाना दिलेला नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
अणसुरे येथे गेल्या सुमारे दहा- बारा वर्षांपासून सुरू असलेल्या कच उत्खननाची चौकशी करून योग्य ती कारवाई करण्याची सातत्याने मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे; मात्र त्याकडे प्रशासनाकडून साफ दुर्लक्ष करण्यात येत असल्याने ग्रामस्थांमधून तीव्र नाराजीही व्यक्त केली जात आहे. या उत्खननप्रकरणी सखोल चौकशी त्याचा सविस्तर अहवाल सादर करण्याचे आदेश प्रांताधिकारी डॉ. जस्मिन यांनी तहबीलदार गंबरे यांना दिले होते. त्यानुसार घटनास्थळी भेट देऊन पाहणी केलाची माहिती तहसीलदार गंबरे यांनी दिली.
घटनास्थळी पाहणीसाठी गेलो त्यावेळी तेथे तेथे कोणतेही उत्खनन सुरू नव्हते; मात्र या ठिकाणची वस्तुस्थिती पाहिल्यावर या ठिकाणी अशा प्रकारे कच उत्खनन होत असल्याचे दिसून आल्याचे गंबरे यांनी सांगितले. सद्यः स्थितीमध्ये अशा प्रकारे कच उत्खननासाठी कोणताही परवाना देण्यात आलेला नाही; मात्र, संबंधितांकडून उत्खनन परवान्यासाठी जिल्हाधिकारी यांच्याकडे प्रस्ताव देण्यात आल्याची माहिती प्राप्त झाल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:45 AM 18/Jan/2025














