गणपतीपुळे : सिनर्जी मरीन ग्रुप व जलजीविका यांच्यावतीने नवी मुंबईतील टी. एस. रहमान मर्चेंट नेव्ही कॉलेज येथे प्रशिक्षण कार्यक्रम नुकताच घेण्यात आला. त्यामध्ये रत्नागिरी तालुक्यातील मालगुंड येथील सेजल राकेश मयेकर हिची मर्चेंट नेव्ही प्रशिक्षणासाठी निवड झाली आहे.
सध्या ती चेन्नई येथे सहा महिन्यांच्या मर्चेंट नेव्ही प्रशिक्षणासाठी दाखल झाली आहे. सिनर्जी मरीन कंपनीच्या चक्रास स्कॉलरशिपसाठी रत्नागिरी सेजल मयेकर तालुक्यातील शिरगावमधील जलजीविका कार्यालयाचे अधिकारी मालगुंड येथील बळीराम परकर विद्यालय तथा भाई मयेकर ज्युनिअर कॉलेजमध्ये माहिती देण्यासाठी आले होते. यावेळी या स्कॉलरशिपसाठी सेजलने आपला अर्ज दाखल केला होता. त्यामध्ये देशातील दोनशे मुलींनी सहभाग घेतला होता. पुणे, मुंबई, झारखंड, राजस्थान या ठिकाणच्या मुली सहभागी झाल्या होत्या. त्यामध्ये ११जणी परीक्षा पास झाल्या तर ११ मधील सहाजणी मुलाखतीसाठी पात्र ठरल्या. त्यामध्ये मालगुंड भंडारवाडा येथील व्यावसायिक राकेश मयेकर यांची कन्या सेजल मयेकर हिची निवड करण्यात आली.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:51 PM 18/Jan/2025














